• 22 October 2021 (Friday)
  • |
  • |


बारावी निकाल ! उद्या लागणार १२ वीचा निकाल ; आज जाहीर होऊ शकते तारीख ?

काही दिवसापूर्वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य...



काही दिवसापूर्वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाचीही विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल उद्या सोमवार दोन ऑगस्टला लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाकडून दुपारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याने निकाल नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा लागणार असल्याची माहिती समोर आली होती. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत निकाल लावण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १६ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. सर्वांना आता बारावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. जुलैअखेर बारावीचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु बोर्डाचे प्रशासकीय काम राहिल्यामुळे ऑगस्ट महिना उजाडला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला. महाराष्ट्र सरकारने बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावीसाठी ३० टक्के, अकरावीसाठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.


महत्वाच्या बातम्या



हवामान