ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी मागे रहायला नको यासाठी सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.मात्र,शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके जमा करून घेतली पण नवीन पुस्तके...
ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी मागे रहायला नको यासाठी सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.मात्र,शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके जमा करून घेतली पण नवीन पुस्तके अद्यापही दिलेली नाही.दरम्यान,विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके परत घेऊ नये,अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांकडून करण्यात आली.त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शाळेत जमा केलेली पाठ्यपुस्तके संबंधित वर्गातील विद्यार्थ्यांना परत मिळतील का,नवीन पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे का,असे अनेक प्रश्न पालक-विद्यार्थ्यांकडून उपस्थित झाले आहेत. यासंदर्भात प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर म्हणाले की,'खुलताबाद तालुक्यात जवळपास पंधरा ते वीस टक्के विद्यार्थ्यांनी जुनी पाठ्यपुस्तके शाळेत जमा केली.तेवढी संख्या वजा करून मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी केली.ऑनलाइन शिक्षणासाठीदेखील पुस्तक महत्त्वाचे असून, जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके उपलब्ध होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास किती पचनी पडेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सेतू वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके सहाय्यभूत ठरणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने त्वरित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे. दरम्यान,सचिन सोळंकी(गटशिक्षणाधिकारी,पं.स.खुलताबाद) यांनी सांगितले आहे की,'सोमवारपर्यंत(२६ जुलै)सुमारे पन्नास टक्के पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकारी कार्यालयास मिळाली आहेत.उर्वरित पुस्तके दोन तीन दिवसात मिळतील,अशी अपेक्षा आहे. जुनी पाठ्यपुस्तके २५ टक्के जमा झाली आहेत. सेतू अभ्यासक्रमासाठी तालुक्यातील शिक्षक गट पद्धतीने शाळेच्या आवारात किंवा गावातील खुल्या मैदानावर शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य