• 25 September 2021 (Saturday)
  • |
  • |


जनरेटरचा धुरामुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी अंत

चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. वीज गेल्याने रात्री जनरेटर लावून हे कुटुंब झोपलं होतं. मात्र जनरेटरच्या धुरामुळे ७ पैकी ६ जणांवर काळाने घाला घातला. सर्व मृत हे लष्करे कुटुंबातील आहेत....चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. वीज गेल्याने रात्री जनरेटर लावून हे कुटुंब झोपलं होतं. मात्र जनरेटरच्या धुरामुळे ७ पैकी ६ जणांवर काळाने घाला घातला. सर्व मृत हे लष्करे कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात लाईट गेली होती. त्यामुळे लष्करे कुटुंबाने घरातील जनरेटर संच लावला होता. रात्री लाईट नसल्यामुळे जनरेटर संच तसाच लावून हे कुटुंब झोपी गेलं. मात्र जनरेटरच्या धुराने घर भरलं. या धुरामुळे झोपेतच सर्वजण गुदमरले आणि ७ पैकी ६ जणांचा मृत्यू झाला. दुर्गापूर भागात वॉर्ड क्र. ३ मध्ये हा सर्व प्रकार घडला. सर्व मयत हे मजूर वर्गातील सदस्य आहेत. रात्री वीज गेल्यावर घरात या कुटुंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता. या धुरामुळे त्यांचे श्वास गुदमरले. सकाळी शेजारच्या लोकांना शंका आल्यावर घटना उघडकीस आली. सर्व मृत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये रमेश लष्करे वय ४४, अजय लष्करे वय २०, लखन लष्करे वय ९, कृष्णा लष्करे वय ८, माधुरी लष्करे वय १८, पूजा लष्करे वय १४ यांचा समावेश आहे. तर दासू लष्करे वय ४० हे एकमेव सदस्य बचावला असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू झाला असून लवकरच कारवाई.


महत्वाच्या बातम्याहवामान