रक्तदान महावितरणात सामाजिक योगदानाचे कौतुक

औरंगाबाद-महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज ग्राहकांना 24 तास अंखडित, सुरळित व दर्जेदार सेवा देण्यास सदैव प्रयत्नशिल असतात. वीज ग्राहकांना अंखडित सेवेबरोबरच सामाजिक कार्याचा वसा महावितरण कर्मचा—यांनी चालू ठेवला आहे. यंदा महावितरण...औरंगाबाद-महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज ग्राहकांना 24 तास अंखडित, सुरळित व दर्जेदार सेवा देण्यास सदैव प्रयत्नशिल असतात. वीज ग्राहकांना अंखडित सेवेबरोबरच सामाजिक कार्याचा वसा महावितरण कर्मचा—यांनी चालू ठेवला आहे. यंदा महावितरण कार्यालय परिसरात एक लाख व्रक्षारोपन केले. राष्ट्रिय कर्तव्य बजावतांना म्रत्यु पावलेल्या सैनिकाच्या पाल्यांना कर्मचा—यांनी एक दिवसाचे पगाराची आर्थिक मदत केली. कर्तव्य बजावतांना व अपघातात म्रत्यु पावलेल्या कुंटुुंबियांना महावितरणच्या सर्व जनसंपर्क अधिका—यांनी आर्थिक मदत केली. अशा अनेक सामाजिक कार्यात महावितरणचे कर्मचारी हिरहिरीने सहभाग घेवून आपले सामाजिक योगदान देतात. रक्तदान सारख्या महत्वपूर्ण योगदानातही महावितरण कर्मचारी मागे राहिले नाहीत. हे या महारक्तदान शिबीरातून दाखवून दिले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महावितरण कंपनीच्या राज्यभरातील कर्मचा—यांनी दि. 11 आॅक्टोबंर 2019 रोजी उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून 5,826 जणांनी रक्तदान करून विक्रम केला. महावितरणच्या इतिहासात व राज्यात पहिल्यांदाच एखादया शासकीय विभागाच्या कर्मचा—यांनी एवढया मोठया संख्येने रक्तदान करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. या रक्तदान शिबीराची आरोग्य विभागाने दखल घेवून महावितरणच्या उपक्रमाचे पत्राद्वारे प्रशंसा करून कौतुकाची थाप मारली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एखादा अपघात झाल्यास आॅपरेशनवेळी रक्ताची रूग्णांना अत्यंत गरज भासते. रूग्णांच्या आॅपरेशवेळीही रक्तदानाची गरज भासते. अशा वेळी गरजुंना योग्य रक्तगटाचे शुध्द रक्त वेळेवर मिळणे आवश्यक असते. गरज पडल्यास या अमुक रक्तगटाची अत्यंत आवश्यकता असते आहे. असे एैकावयास मिळते. यासाठी रूग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. बाजारू रक्तदात्यांना वाटेल ती किमंत देवून रक्त विकत घेण्याची वेळ रूग्णाच्या नातेवाईकावर येते. अन्यथा वेळप्रसंगी ठरावीक रक्तगटाचे मिळते जुळते रक्तगटाचे रक्त न मिळाल्यास रूग्ण दगावण्याची भिती असते. यासाठी रक्तपेढयात मुबलक प्रमाणात शुध्द रक्तसाठा असणे अत्यंत आवश्यक असते. साधारणपणे आॅक्टोंबर— नोव्हेंबर व एप्रिल— मे महिन्यात रक्तदान शिबीर अथवा रक्तदानाचे प्रमाण कमी प्रमाणात असते. अपघाताचे प्रमाणही या महिन्यात जास्त असते. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्तदान शिबीरे घेण्याचे आदेशित केले होते. महावितरण कंपनीने रक्तदान हे सामाजिक कार्य समजून महावितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी दि. 11 आॅक्टोंबर 2019 रोजी राज्यभरात महावितरण कर्मचा—यांचे रक्तदान शिबीर घेण्याचे सुनियोजित नियोजन करून त्याची चोख अंमलबजावणी केली. या रक्तदान शिबीरात महावितरणचे कार्यकारी संचालक श्री श्री पवनकुमार गंजु यांच्यासह महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री राहुल रेखावार तसेच वरिष्ठ अधिकारी व परिमंडल कार्यालयातील मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, अभियंते, अधिकारी, कर्मचारी, महिला, विविध संघटनांचे प्रतिनिधींनी मोठया प्रमाणात हिरहिरीने सहभाग घेवून रक्तदान केले. रक्तदान हे सामाजिक कार्य आहे. रक्तदानमुळे कुठलाही धोका होत नाही. रक्तदान केल्यानंतर शरिरात काही दिवसात पुरेशा प्रमाणात पुन्हा नवीन रक्त तयार होते. अशा स्वरूपाचे प्रबोधन मान्यवरांनी शिबीर प्रसंगी करून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. एकदा रक्तदान केल्यानंतर पुढील तीन महिने त्या व्यक्तिने रक्तदान करू नयेत. रक्तदान करण्यासाठी किमान 45 किलो वजन सदर व्यक्तिचे असणे गरजेचे आहे. शुगर, रक्तदाब असलेले व्यक्ति, कावीळ तसेच गंभीर आजार असलेल्या व्यक्तिने अथवा रूग्णाने रक्तदान करू नयेत. यामुळे कर्मचारीवर्ग मोठया प्रमाणात या महारक्तदान शिबीरात सहभागी होवून रक्तदान केले. रक्तदानामध्ये परिमंडलनिहाय सहभागी झालेले महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील एकूण सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे - मुख्य कार्यालय प्रकाशगड-१६४, बारामती परिमंडल-८०२, पुणे परिमंडल -११७, कोल्हापूर परिमंडल -६९२, रत्नागिरी परिमंडल-३७, नाशिक परिमंडल- ५००, औरंगाबाद परिमंडल -२३२, नांदेड परिमंडल-३०८, अकोला परिमंडल-४३०, नागपूर परिमंडल- ६३६, अमरावती परिमंडल-३६७, चंद्रपूर परिमंडल-३५६, गोदिया परिमंडल-११०, लातूर परिमंडल-३८५, कल्याण परिमंडल-२९९, भांडूप परिमंडल- २४६, जळगांव परिमंडल- १४५ यामध्ये सुमारे ५ हजार ८२६ कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी रक्तदान करून महादानाचे कर्तव्य बजावले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.तसेच राज्यभरातील रक्तदान शिबिरासाठी शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालये व रक्तपेढ्यांनी सहकार्य केले तर महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्य रक्तदानासाठी सकाळपासूनच उस्फुर्तपणे सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. वीज कर्मचा—यांनी उत्स्फुर्तपणे केलेल्या विक्रमी रक्तदानामुळे हा रक्ताचा तुठवडा भरून निघाला असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधानसचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महावितरणला पत्र पाठवून महावितरणच्या उपक्रमाचे पत्राद्वारे प्रंशसा करून कौतुक केले आहे.

हवामान