• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


मुंबईकरांसाठी 'बेस्ट'ची खुशखबर, प्रवास होणार स्वस्त?

मुंबई : मुंबईत आता बेस्ट बसने फिरणं अति स्वस्त होण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या समितीच्या आज होणाऱ्या बैठकीत मोठ्या प्रमाणात कपात केली जाऊ शकते. विशेष म्हणजे वातानुकुलीत बसचे तिकीट दर ६ रूपयांवर आणले जाण्याची शक्यता आहे. तर साध्या...मुंबई : मुंबईत आता बेस्ट बसने फिरणं अति स्वस्त होण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या समितीच्या आज होणाऱ्या बैठकीत मोठ्या प्रमाणात कपात केली जाऊ शकते. विशेष म्हणजे वातानुकुलीत बसचे तिकीट दर ६ रूपयांवर आणले जाण्याची शक्यता आहे. तर साध्या गाडीचं भाडं ५ रूपयांवर येऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेनं सशर्त आर्थिक मदत देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामध्ये तिकीट दर कमी करण्याचीही अट होती. त्यानुसार हा प्रस्ताव आज - शुक्रवारी होत असलेल्या बेस्ट बैठकीत मंजूर केला जाऊ शकतो. वातानुकुलीत बसचं सध्या ५ किलोमीटरसाठी भाडं ३० रूपये आहे ते ६ रूपयांवर आणण्याचा प्रस्ताव आहे तर साध्या गाडीचं सध्या ५ किलोमीटरसाठी भाडं ८ रूपये आहे ते ५ रूपयांवर येऊ शकतं. खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी आणि प्रवाशांना पुन्हा बेस्टकडे आकर्षित करण्यासाठी दर कपातीची मागणी वारंवार होत होती. वातानुकूलित बसच्या तिकीट दरातही कपात होणार असल्याचं समजतंय..असे असतील नवे दर ५ किमीपर्यंत - ५ रुपये १० किमीपर्यंत - १०रुपये १५ किमीपर्यंत - १५ रुपये १५ किमीच्या पुढे - २० रुपये दैनिक पास - ५० रुपये


महत्वाच्या बातम्याहवामान