• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


बुलढाण्यात मेडिकल कॉलेजला मान्यता

बुलढाणा : राज्यात नवीन सात वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आलेली असून त्यात बुलढाणा येथील मेडिकल कॉलेजलाही मान्यता देण्यात आली आहे. बुलढाणा येथे मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचे गेल्या 15...बुलढाणा : राज्यात नवीन सात वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आलेली असून त्यात बुलढाणा येथील मेडिकल कॉलेजलाही मान्यता देण्यात आली आहे. बुलढाणा येथे मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचे गेल्या 15 वर्षांपासूनचे अथक प्रयत्न फलद्रुप झाले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेऊन मान्यता मिळविल्याने बुलढाण्यासोबत नाशिक, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा, परभणी, अमरावती या ठिकाणच्या मेडिकल कॉलेजला सुद्धा मान्यता देण्यात आल्याचे म्हटले आहे. बुलढाणा येथे मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी 2004 पासून प्रयत्न सुरु केले होते. ते आमदार असताना त्यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न, लक्षवेधी, अर्धातास चर्चा, राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील चर्चा, अर्थसंकल्पीय चर्चा, कपात सूचना, स्थगन प्रस्ताव, औचित्याचा मुद्दा या सर्व विधिमंडळ आयुधांमार्फत शासनाचे लक्ष वेधले होते. 2008-09 च्या अधिवेशनात विजयराज शिंदे यांनी बुलढाणा येथे मेडिकल कॉलेज व्हावे या विषयावरील उपस्थित केलेल्या अर्धातास चर्चेवर सर्वप्रथम सभागृहात सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी बुलढाणा येथे मेडिकल कॉलेजची किती नितांत गरज आहे हे आणि मेडिकल कॉलेजला लागणारे निकष व पात्रता बुलढाण्यात पूर्ण करतो हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर तत्कालीन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री सावंत यांनी यानंतर ‘राज्यात कुठेही मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यात येईल त्यावेळी बुलढाणा येथील मेडिकल कॉलेज पहिले असेल’ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मेडिकल कॉलेजला खूप खर्च येतो आणि त्या अगोदर मान्यता दिलेल्या मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण न झाल्याने तेव्हापासून कोणत्याही मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यात आलेली नव्हती. विजयराज शिंदे हे पदावर नसताना सुद्धा त्यांनी हा मुद्दा सतत लावून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2017 मध्ये भारतीय जैन संघटनेच्या सुजलाम सुफलाम या कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे आले असता विजयराज शिंदे यांनी त्यांना एक निवेदन देऊन बुलढाणा येथील मेडिकल कॉलेजला मान्यता देण्याची विनंती केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी जून 2018 मध्ये उच्चस्तरीय सचिव बैठक घेऊन बुलढाणा येथील मेडिकल कॉलेजसाठी लागणार्‍या अटी व पात्रतेच्या निकषासाठी समिती पाठवून अहवाल बोलविला होता. त्यावर संभाजीनगर येथील घाटी मेडिकल कॉलेजचे डॉ. कैलास झीने यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समिती बुलढाणा येथे येऊन गेली. त्यात समितीने बुलढाणा येथे उपलब्ध खाटा, निकषाप्रमाणे उपलब्ध जागा, उपलबद्ध पायाभूत सुविधांची पाहणी केली होती. बुलढाणा येथे मेडिकल कॉलेजची स्वतंत्र इमारत जरी नसली तरी जिल्हा सामान्य रुग्णालय, क्षय आरोग्य धाम, नवीनच बांधण्यात आलेली स्त्री व बाल रुग्णालयाची इमारत व तेथील जागा व इतर लागणार्‍या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने या उपलब्ध सुविधेतच मेडिकल कॉलेज तात्काळ सुरु होऊ शकते हि बाब त्रिसदस्यीय समितीच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याप्रमाणे सकारात्मक अहवाल शासनास सादर करण्याची विनंती सुद्धा विजयराज शिंदे यांनी समितीला अप्पर जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत एक लेखी निवेदन देऊन केली होती. मान्यता देण्यासंदर्भात आलेल्या बातमीमध्ये सुध्दा जिल्हा रुग्णालयांतर्गत नवीन शासकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आल्याचे म्हटलेले असल्याने वैद्यकिय शिक्षण विभागाच्या बुलढाणा येथे कोणत्याही पायाभूत सुविधा नसतांना हि कदाचित याच वर्षात मेडिकल कॉलेज सुरु होऊ शकते अशी आशा निर्माण झाली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये म्हणून याच वर्षी बुलढाणा येथे मेडिकल कॉलेज सुरु व्हावे यासाठी जातीने स्वतः लक्ष घालणार असल्याचे विजयराज शिंदे यांनी सूतोवाच केले आहे. तसेच बुलढाणा येथील मेडिकल कॉलेजला मान्यता दिल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकिय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे जाहीर आभार मानले आहे


महत्वाच्या बातम्याहवामान