• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


औरंगाबाद : शिवसेना-काँग्रेस आघाडी तुटली

औरंगाबाद : शिवसेनेने जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडावी, नंतरच आम्ही प्रचार करू अशी भूमिका भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी घेतली होती. यामुळे औरंगाबाद मध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारापासून भाजपचे पदाधिकारी...औरंगाबाद : शिवसेनेने जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडावी, नंतरच आम्ही प्रचार करू अशी भूमिका भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी घेतली होती. यामुळे औरंगाबाद मध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारापासून भाजपचे पदाधिकारी अलिप्त होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने काँग्रेस सोबतची युती तोडत असल्याचे स्पष्ट केले. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला दूर करत काँग्रेससोबत आघाडी केली होती. त्यानुसार सध्या जिल्हा परिषदेत अध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने शिवसेनेची चांगलीच गोची केली. शिवसेनेचे उमेदवार असलेले खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारापासून भाजप कार्यकर्ते दूरच होते. शिवसेनेने जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडावी, नंतरच आम्ही प्रचार करू अशी भूमिका भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी घेतली होती. मात्र सेनेने आतापर्यंत याबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेतला नव्हता. आज अखेर यावर तोडगा निघाला. तर शिवसेनेने ही आघाडी तोडली. मात्र जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांचा कार्यकाळ आता अवघा तीन महिन्यांचा शिल्लक आहे. त्यामुळे या काळात अविश्वास प्रस्ताव वगैरे या गोष्टी न करता तीन महिने वाट पाहणे आणि त्यानंतर शिवसेना-भाजप अशी एकत्रित अध्यक्ष अध्यक्षपदाची निवडणूक लढवणे असे बैठकीत ठरले. बैठकीला शिवसेनेकडून खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भागवत कराड, शहर अध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती.


महत्वाच्या बातम्याहवामान