• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


औरंगाबादमध्ये काँग्रेसला मोठा झटका, अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला

औरंगााबाद, : लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. 'मला लोकांमध्ये जाऊन नशीब अजमावयाचे आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणारच,' असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी...औरंगााबाद, : लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. 'मला लोकांमध्ये जाऊन नशीब अजमावयाचे आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणारच,' असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे. 'मी कुणावरही नाराज नाही. मी औरंगाबादमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी काँग्रेसचा राजीनामा आधीच दिलेला आहे. आता काँग्रेस आमदार म्हणून बोलत नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत देणार आहे,' अशी घोषणाही अब्दुल सत्तार यांनी केली आहे. 'मला माझ्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आता मी माघार घेणार नाही,' असा आक्रमक पवित्रा सत्तारांनी घेतला आहे. दरम्यान, रात्री उशीरा काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये औरंगाबादच्या उमेदवाराचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी पाच मतदारासंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये लातूर, चंद्रपूर, जालना, औरंगाबाद आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसकडून अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारसंघ आणि काँग्रेस उमेदवार चंद्रपूर येथे विनायक बांगडे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. नरेश पुगलिया आणि विजय वड्डेटीवार गटातील मतभेदाच्या वादात अखेर बांगडे यांच नाव समोर आलं आहे. जालना- विलास औताडे, औरंगाबाद- सुभाष झांबड, भिवंडी- सुरेश तावरे, लातूर- मच्छिंद्र कामत, भाजपनेही महाराष्ट्रातील आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये जळगाव, सोलापूर, बारामती, दिंडोरी, नांदेड, पुणे या सहा मतदारसंघातील उमेदवार भाजपने घोषित केले आहेत. पुण्यातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापत पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, बारामतीतून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपची दुसरी यादी जाहीर, कुठून कोण लढणार? जळगाव - स्मिता वाघ, नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर, बारामती - कांचन राहुल कुल, दिंडोरी - भारती पवार, सोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी,


महत्वाच्या बातम्याहवामान