• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


नियमभंग केल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस

पुणे: जमीन कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्याच्या आयुक्तांनी लता मंगेशकर फाऊन्डेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. कमीतकमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा करार दीनानथ मंगेशकर रुग्णालयाने मोडला...पुणे: जमीन कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्याच्या आयुक्तांनी लता मंगेशकर फाऊन्डेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. कमीतकमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा करार दीनानथ मंगेशकर रुग्णालयाने मोडला असल्याची तक्रार रमेश धर्मावत यांनी दाखल केली आहे. काही वर्षांपूर्वी ९९ एकर जमीन मंगेशकर फाउन्डेशनने सरकारकडून केवळ रूपये १ किंमत मोजून लीजवर घेतली होती. या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या रुग्णालयामध्ये कमीतकमी दरात वैद्यकीय सुविधा दिल्या जातील असा करार करण्यात आला होता. ' करारानुसार २० रुपयात वैद्यकीय चेकअप करण्यात येईल असं वचन देण्यात आलं होतं. पण वास्तवात मात्र चेकअपसाठी ६०० रुपये आकारले जात आहेत. ही सरकारची फसवणूक आणि गरिबांची लूट आहे'.असा आरोप रमेश धर्मावत यांनी केला आहे. तसंच कॅन्टीनसाठी देण्यात आलेली जागाही मंगेशकर फाउन्डेशनने भाडेतत्वावर दिली आहे.'दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि लता मंगेशकर फाउन्डेशनला नोटीस बजावण्यात आली आहे. जर त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल' असा इशारा पुण्याच्या आयुक्तांनी दिला आहे. दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मात्र हे आरोप फेटाळले आहे.' करारातील कोणत्या ही कलमांचे उल्लंघन आम्ही केलेलं नाही. आम्हाला नोटीस मिळाली असून आम्ही लवकरच त्याचे समाधानकारक उत्तर देऊ.' असं स्पष्टीकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दिलं आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान