• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


विदर्भामुळे मराठी रंगभूमीला स्थैर्य

राम गणेश गडकरी नाट्यनगरी (नागपूर) : स्वातंत्र्योत्तर काळात साठव्या दशकात मुंबई प्रांतात नाटकांवर कर लादला जात होता. त्यामुळे नाटकांची दैन्यावस्था झाली होती. मात्र, मराठी रंगभूमीला चांगले स्थैर्य मिळाले ते केवळ विदर्भामुळेच, असे नमूद...राम गणेश गडकरी नाट्यनगरी (नागपूर) : स्वातंत्र्योत्तर काळात साठव्या दशकात मुंबई प्रांतात नाटकांवर कर लादला जात होता. त्यामुळे नाटकांची दैन्यावस्था झाली होती. मात्र, मराठी रंगभूमीला चांगले स्थैर्य मिळाले ते केवळ विदर्भामुळेच, असे नमूद करीत अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अ. भा. मराठी नाट्य संमेलनाच्या उद्‌घाटनात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या आई-वडिलांनी 1949 मध्ये सुरू केलेल्या नाट्य कंपनीद्वारे निर्मित नाटकांचा काळ डोळ्यापुढे उभा करीत त्यांनी विदर्भाने केलेल्या मदतीचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, मुंबईत नाटकांची दैन्यावस्था होत असताना विदर्भ व मराठवाड्याने भक्कम पाठिंबा दिला. त्यावेळी हैदराबाद येथे नाटक सादर केल्यानंतर तेथील एका अधिकाऱ्याने त्याचे ऊर्दू रूपांतरासाठी आग्रह धरला. मात्र, तेथील एका थिएटरमालकाने मदत केली. तेथून चंद्रपूरला आल्यानंतर जयंत टॉकीजमध्ये नाटकांचे प्रयोग झाले. येथे नाटकातून चांगले उतन्नही मिळाले. शेतकऱ्यांनी धान्य दिले. त्यामुळे विदर्भात गावागावांत नाटकांचे प्रयोग झाले. एका गावात नाटकासाठी मुक्काम असताना नाटकाचा शामियाना वादळाने उडाला. त्यावेळी नागपूरचे श्रीमंत बाबूराव देशमुख यांनी दोन हजार रुपयांची मदत केली. असे दिलदार हृदय विदर्भाचे आहे. येथील वृत्तपत्रांनीही मदत केली. चांगल्या माणसाठी विदर्भ नेहमीच धावून आला. विदर्भ, मराठवाडा पाठीशी होता, म्हणून नाटक जिवंत राहिले, असेही त्या म्हणाल्या. संमेलनाध्यक्षा म्हणून नाट्य परिषदेच्या विविध शाखांना भेटी दिल्या. अनेक नवे कलावंत घडत असल्याचे दिसून आले. नवी पिढी हुशार असून त्यांना रसिकांच्या शाबासकीची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. यानंतर त्यांनी संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याकडे सोपविली.


महत्वाच्या बातम्याहवामान