• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


विद्यार्थ्यांच्या वजनानुसार राहणार दप्तराचे ओझे

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता व विद्यार्थ्यांच्या वजननिहाय दप्तराचे वजन किती असावे, याचे निकष ठरविले आहेत मागील काही वर्षात विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे ओझे विद्यार्थी वाहून...शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता व विद्यार्थ्यांच्या वजननिहाय दप्तराचे वजन किती असावे, याचे निकष ठरविले आहेत मागील काही वर्षात विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे ओझे विद्यार्थी वाहून नेत होते. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत होता. याबाबत वैद्यकीय अधिकाड्ढयांनीही जास्त वजनाच्या दप्तराचा विद्यार्थ्यांच्या शरीरातील विविध अवयवांवर वाईट परिणाम होतो, असा निर्वाळा दिला होता.त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय वजन व शाळेमध्ये आवश्यक साहित्याचे वजन निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के दप्तराचे वजन अपेक्षित आहे. आवश्यक साहित्याचे वजन, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, सर्व साहित्य ठेवण्याची बॅग इत्यादींचा त्यात समावेश आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर तसा अहवाल गटशिक्षणाधिकाड्ढयांना सादर करावयाचा आहे. याबाबत १५ जुलै रोजी संबंधित शाळांना सूचना दिल्या आहेत. लहान मुलांना दप्तरांच्या ओझ्यामुळे चालता येत नाही. दररोज वजन वाहून नेल्यामुळे हाडांचे, मणक्यांचे व पाठदुखींचे अनेक गंभीर आजार जडले आहेत. शाळेत दरदिवशी किमान पुस्तके व साहित्यांचा वापर करावा, अशी पालकांची मागणी होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. शासनाने ही परिस्थिती बदलविण्याकरिता ठोस कार्यवाही केली आहे. याबाबत शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आकस्म्सिक तपासणी मोहीम राबविण्याची शक्यता आहे.दप्तराच्या ओझ्याबाबत तक्त्यातील नोंदीइयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचे वजन २०.७ कि.मी.ग्रॅम आहे, तर साहित्यासह दप्तराचे वजन १८८० ग्रॅम असावे, असे तक्त्यांत निर्देशित केले आहे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे १७८५ ग्रॅम, इयत्ता तिसरी २४०० ग्रॅम, इयत्ता चौथी २६८५ ग्रॅम, पाचवी ३१२५ ग्रॅम, सहावी ३१४१, सातवी ३३५६, आठवी ३४२५ ग्रॅमचा समावेश आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत दप्तरात पुस्तके, वह्या कंपासपेटी यांचे वजनाचा समावेश करण्यात आला आहे. यात पहिलीच्या विद्यार्थ्यांना तीन पुस्तके दप्तरात असावी, अशी नोंद तक्त्यात केली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर अनेक मुख्याध्यापकांना दप्तराच्या ओझ्याबाबत सूचना दिल्या होत्या. उर्वरित मुख्याध्यापकांना लवकरच सूचना देऊन, आवश्यकता भासल्यास मोहीम राबवून कार्यवाही करण्यात येईल


महत्वाच्या बातम्याहवामान