• 29 July 2021 (Thursday)
  • |
  • |


बीए, बीएस्सी बंद होणार

देशातील विद्यापीठांतून शिकवले जाणारे बीए आणि बीएसस्सी पदवी अभ्यासक्रम सध्याच्या हायटेक युगात टुकार ठरत असून ते बंद करून त्या जागी प्रभावी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्याचा हायटेक प्रस्ताव...देशातील विद्यापीठांतून शिकवले जाणारे बीए आणि बीएसस्सी पदवी अभ्यासक्रम सध्याच्या हायटेक युगात टुकार ठरत असून ते बंद करून त्या जागी प्रभावी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्याचा हायटेक प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आणला आहे. यापुढे देशभरात बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन (बी. व्होक) हा पदवी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. या नव्या डिग्री कोर्सचा अभ्यासक्रम उद्योगजगताच्या मागणीनुसार तयार केला जाणार आहे. बीए आणि बीएस्सी हे विद्यापीठात शिकवले जाणारे पदवी अभ्यासक्रम सध्याच्या हायटेक युगात रोजगार मिळवून देण्यास सक्षम नसल्याचा दावा यूजीसीने केला आहे. त्यातून केवळ खर्डेघाशी करणारे कारकूनच तयार होत आहेत. त्याऐवजी संगणक युगाशी नाते जोडणारा आणि प्रचलित उद्योगधंद्यासाठी सक्षम कर्मचारी तयार करणारा बी.व्होक. हा अभ्यासक्रम येत्या काही वर्षांत बीए आणि बीएस्स्सी या अभ्यासक्रमांची जागा घेईल, असे प्रतिपादन यूजीसीचे व्हाइस चेअरमन एच. देवराज यांनी केले आहे. - गुणवत्ता, पायाभूत सुविधा पाहूनच महाविद्यालयांना अनुदान-- भविष्यात देशातील महाविद्यालयांना ते राबविणारे अभ्यासक्रम पायाभूत सुविधा, शिकविल्या जाणार्या शिक्षणाचा दर्जा आणि संशोधनात्मक उपक्रम राबविण्याची क्षमता पाहूनच शैक्षणिक अनुदान दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षण संस्थांना अधिकाधिक जबाबदार बनविण्याचा यूजीसीचा हेतू आहे, असेही देवराज यांनी सांगितले. - बी. व्होक हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम येत्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात देशातील २०० महाविद्यालयांत सुरू केला आहे. त्यानंतर पुढच्या १० वर्षांत तो देशभरातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांत शिकविण्यासाठी समाविष्ट करण्याची घोषणा यूजीसीने केली आहे. सध्याच्या हायटेक युगात उद्योगक्षेत्राचा चेहरामोहराच बदलला आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाला बीए आणि बीएस्सी या केवळ कारकून घडविणार्या पदवी अभ्यासक्रमांबाबत फेरविचार करावाच लागेल. कारण या पदव्यांच्या बळावर नोकर्याच मिळत नाहीत हे भीषण वास्तव आहे.


महत्वाच्या बातम्याहवामान