घनसावंगी - चिंचोलीवाडी (ता. घनसावंगी) येथील जयश्री अंगद बुधनर व मुक्ताबाई पोपटराव बुधनर (दोघींचे वय १९) या दोघींचे सोमवारी शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या सकाळी कापूस वेचण्यासाठी शेतात गेल्या होत्या. हा...
घनसावंगी - चिंचोलीवाडी (ता. घनसावंगी) येथील जयश्री अंगद बुधनर व मुक्ताबाई पोपटराव बुधनर (दोघींचे वय १९) या दोघींचे सोमवारी शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या सकाळी कापूस वेचण्यासाठी शेतात गेल्या होत्या. हा घातपात की आत्महत्या हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी नामदेव वायसे यांनी घनसावंगी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य