• 19 March 2024 (Tuesday)
  • |
  • |


...शेतीतील उत्पन्न क्लास वन अधिकाऱ्याएवढं

बुलडाणा: सर्वात जास्त शेतकरी आत्महत्यांचा भाग म्हणून विदर्भाकडे पाहिलं जातं. त्यामुळेच या भागातील शेती यशोगाथेला – त्यातही ती महिला शेतकऱ्याशी संबंधित असेल तर – एक वेगळंच महत्व आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, कोरडवाहू शेतीत पीक...



बुलडाणा: सर्वात जास्त शेतकरी आत्महत्यांचा भाग म्हणून विदर्भाकडे पाहिलं जातं. त्यामुळेच या भागातील शेती यशोगाथेला – त्यातही ती महिला शेतकऱ्याशी संबंधित असेल तर – एक वेगळंच महत्व आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, कोरडवाहू शेतीत पीक बदलातून महिन्याला लाख रुपये कमावणाऱ्या, बुलडाण्यातल्या सुनीता ताडे आहेत आजच्या खऱ्या शेतीतल्या नवदुर्गा, त्यांचीच ही यशोगाथा सुनिता ताईंची शेती महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सुनगाव हे जळगाव जामोद या आदिवासी बहुल भागातलं एक गाव. सातपुड्याच्या सानिध्यातला हा परिसर अविकसित आणि समस्यांनी कायमच घेरलेला. याच भागात सुनिताताई ताडे यांची ८ एकर कोरडवाहू शेती आहे. खरीपात कापूस तूर आणि रबीत गहू भुईमुगाची लागवड आणि त्यापासून मिळणारं जेमतेम उत्पन्न, हे चक्र भेदायचं सुनिताताईंनी ठरवलं. त्यांनी एक एकरात लेंडी पिंपळी म्हणजेच पानपिंपळी या औषधी वनस्पतीची लागवड केली. पानपिंपळीची शेती सुनीताताई यांनी लागवडी पूर्वी दोन ट्रॉली शेणखत टाकून शेत तयार केलं. त्यावर नांगरणी आणि रोटावेटर करून २ बाय२ चे १२०० वाफे तयार करून घेतले, जानेवारी २०१३ मध्ये त्यात अंजनगाव सुर्जी येथून आणलेले पानपिंपळीची – बेणे टोचण पद्धतीने- लागवड केली. पांगाऱ्याच्या झाडावर हे पानपिंपळीचे वेल चढवले. वेळोवेळी खत- औषधांचं नियोजन केलं. पहिल्या वर्षी लागवडीसाठी या पिकाला दोन लाखांचा खर्च आला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी दीड लाख खर्च आला. पहिल्या वर्षी ८ क्विंटल उत्पादन मिळालं, आता १५ क्विंटलपर्यंत उत्पादन होत आहे. एकदा लागवड केल्यावर पुन्हा पुन्हा लागवड करण्याची गरज नसते.तिसऱ्या वर्षी १५ क्विंटल उत्पादन सुनीता ताडे यांचे पान पांगरा उत्पादनाचे हे तिसरे वर्ष आहे. त्यांना १५ क्विंटल उत्पादन झालंय ज्याला दिल्लीचे व्यापारी जागेवर ४८ हजार रुपये क्विंटलचा दर देतात. म्हणजे एकरी साडेसात लाख रुपये मिळतात, दीड लाखाचा खर्च वजा जाता पानपिंपळीपासून सहा लाखाचा निव्वळ नफा त्यांना मिळतोय.श्araूप्ग् Nौे ्न श्aप्araेप्ूra ्न शिक्षण १२ वी पास, शेतीतील उत्पन्न क्लास वन अधिकाऱ्याएवढं शिक्षण १२ वी पास, शेतीतील उत्पन्न क्लास वन अधिकाऱ्याएवढं ँब्: संदिप शुक्ला, एबीपी माझा, बुलडाणा | थ्aेू ळज््aूा्: ्न एaूल्r्aब्, १७ ध्म्ूदंी २०१५ ७:०३ झ्श् एपूग्ूग्त् Naन््ल्rुa एल्हग्ूa ऊa बुलडाणा: सर्वात जास्त शेतकरी आत्महत्यांचा भाग म्हणून विदर्भाकडे पाहिलं जातं. त्यामुळेच या भागातील शेती यशोगाथेला – त्यातही ती महिला शेतकऱ्याशी संबंधित असेल तर – एक वेगळंच महत्व आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, कोरडवाहू शेतीत पीक बदलातून महिन्याला लाख रुपये कमावणाऱ्या, बुलडाण्यातल्या सुनीता ताडे आहेत आजच्या खऱ्या शेतीतल्या नवदुर्गा, त्यांचीच ही यशोगाथा ंल्त््प्aहa हaन््ल्rुa सुनिता ताईंची शेती महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर सुनगाव हे जळगाव जामोद या आदिवासी बहुल भागातलं एक गाव. सातपुड्याच्या सानिध्यातला हा परिसर अविकसित आणि समस्यांनी कायमच घेरलेला. याच भागात सुनिताताई ताडे यांची ८ एकर कोरडवाहू शेती आहे. खरीपात कापूस तूर आणि रबीत गहू भुईमुगाची लागवड आणि त्यापासून मिळणारं जेमतेम उत्पन्न, हे चक्र भेदायचं सुनिताताईंनी ठरवलं. त्यांनी एक एकरात लेंडी पिंपळी म्हणजेच पानपिंपळी या औषधी वनस्पतीची लागवड केली. पानपिंपळीची शेती सुनीताताई यांनी लागवडी पूर्वी दोन ट्रॉली शेणखत टाकून शेत तयार केलं. त्यावर नांगरणी आणि रोटावेटर करून २ बाय२ चे १२०० वाफे तयार करून घेतले, जानेवारी २०१३ मध्ये त्यात अंजनगाव सुर्जी येथून आणलेले पानपिंपळीची – बेणे टोचण पद्धतीने- लागवड केली. पांगाऱ्याच्या झाडावर हे पानपिंपळीचे वेल चढवले. वेळोवेळी खत- औषधांचं नियोजन केलं. पहिल्या वर्षी लागवडीसाठी या पिकाला दोन लाखांचा खर्च आला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी दीड लाख खर्च आला. पहिल्या वर्षी ८ क्विंटल उत्पादन मिळालं, आता १५ क्विंटलपर्यंत उत्पादन होत आहे. एकदा लागवड केल्यावर पुन्हा पुन्हा लागवड करण्याची गरज नसते. तिसऱ्या वर्षी १५ क्विंटल उत्पादन सुनीता ताडे यांचे पान पांगरा उत्पादनाचे हे तिसरे वर्ष आहे. त्यांना १५ क्विंटल उत्पादन झालंय ज्याला दिल्लीचे व्यापारी जागेवर ४८ हजार रुपये क्विंटलचा दर देतात. म्हणजे एकरी साडेसात लाख रुपये मिळतात, दीड लाखाचा खर्च वजा जाता पानपिंपळीपासून सहा लाखाचा निव्वळ नफा त्यांना मिळतोय. ंल्त््प्aहa हaन््ल्rुa महिलांना प्रशिक्षण सुनीताताई आणि त्यांच्यासारख्या उद्यमशील महिलांच्या मदतीसाठी महिला आर्थिक विकास मंडळ माविमने पुढाकार घेतला. त्यांच्या तेजस्विनी बचत गटातील महिलांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतलं, अर्थसहाय्यासोबतच माविमने शेतीतील नवनवीन प्रयोग करण्यासाठी महिलांना प्रोत्साहनही दिलं. त्यातूनच सुनीताताईंनी पानपिंपळी औषधी वनस्पती लागवड करुन आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरु केली. बुलडाणा जिल्ह्यात वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक शेतकरी आहेत. पारंपरिक पिकांच्या पलिकडे जाऊन शेतीचा विचार केला तर शेती तोट्यात जाणार नाही असं सुनीताताई सांगतात. क्लासवन अधिकाऱ्याएवढं मासिक उत्पन्न बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या सुनिताताई जुनी परंपरागत कोरडवाहू शेती करत असत. त्यात त्यांना खर्च वजा जाता बेताचा नफा उरायचा. त्यांची शेतीपण निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असायची. त्याला वनौषधीची जोड देऊन सुनिताताई ताडे आज १० लाखांचा नफा कमावतायत. म्हणजे त्यांच्या ८ एकर शेतीतून महिन्याला ८० हजार रुपये मिळवतायत. थोडक्यात, बारावी पास सुनीताताई सुनगावसारख्या आदिवासी भागात शेतीतून क्लास वन अधिकाऱ्याचा पगार मिळवत आहेत. त्यामुळेच सुनिताताई आहेत शेतीतील नवदुर्गा.


महत्वाच्या बातम्या



हवामान