• 19 March 2024 (Tuesday)
  • |
  • |


प्लास्टिकबंदी योग्य की अयोग्य?

प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले अहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालूनही त्यांचा सर्रास वापर सुरू आहे. या पिशव्यांना अटकाव करण्यासाठी यंत्रणा प्रभावी काम करताना दिसत नाही....



प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले अहेत. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घालूनही त्यांचा सर्रास वापर सुरू आहे. या पिशव्यांना अटकाव करण्यासाठी यंत्रणा प्रभावी काम करताना दिसत नाही. आता प्लास्टिकच्या विविध उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यानिमित्ताने प्लास्टिक उत्पादक व पर्यावरणवादी यांना काय वाटते, याविषयीची त्यांची मते. चुकीचा निर्णय प्लास्टिकच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा आहे. या निर्णयामुळे मूळ समस्या सुटणार नसून उलट अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. या निर्णयामुळे प्लास्टिक उत्पादन व्यवसायावर संकट येईल, हजारो लोकांचा रोजगार जाईल यात शंकाच नाही. यासंदर्भातील मूळ समस्या मात्र सोडवता आलेली नाही, याची खंत वाटते. विशिष्ट जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. तरीही या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. विशिष्ट मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा पुन्हा करता येत नाही. या पिशव्या वापरून झाल्यावर लोक त्या कुठेही टाकून देतात. परिणामी त्या ड्रेनेज लाइनमध्ये अडकून पाणी तुंबण्यासारखी समस्या निर्माण होते. त्यामुळे या पिशव्यांवरील बंदीच्या अंमलबजवणीचे काय झाले, याचे उत्तर आधी सरकारने दिले पाहिजे. प्लास्टिक बंदीबाबत सरसकट निर्णय घेणे संयुक्तिक नाही. प्लास्टिकच्या ९० टक्के बाटल्या या रिसायकल होतात. ६० टक्के प्लास्टिक डम्पिंग ग्राउंडवर जाते, त्याचेही रिसाकल‌िंग होते. उद्योगातील १०० टक्के टाकावू प्लास्टिकचेही रिसायकलिंग होते. या वस्तुस्थितीकडे का डोळेझाक केली जाते? उद्या सरसकट बंदी आली, तर रोगापेक्षा उपाय भयंकर अशीच स्थिती होणार आहे. आजच्या घडीला लाखो लोक कार्यालयात जाताना पिण्याच्या पाण्यासाठी प्लाटिकच्या बाटल्यांचा वापर करतात. या बाटल्यांच्या जागी तुम्ही त्यांना काचेच्या बाटल्या वापरण्यास सांगणार का? तसे करणे सोयीचे होइल का? काचेच्या बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल तर या बाटल्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होईल. या बाटल्या तयार करताना मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. कार्बनच्या वाढत्या उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. असे असताना आपल्या इथे मात्र उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे पर्यावरणाच आणखी हानी होईल, या बाबीकडे कुणाचे लक्ष नाही. काचेच्या बाटल्या धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा वापर वाढेल. एखाद वर्ष कमी पाऊस झाला की, आपल्या इथे पाणी टंचाई न‌र्मिाण होते. त्यामुळे अशा प्रकारे पाण्याची नासाडी परवडणार आहे का? आजच्या घडीला सबंध भारतात प्लास्टिक उद्योगाचे ५५ हजार युनिट आहेत. त्यात ५.५ बिलियन टन प्लास्टिक तयार होते. लाखो लोक या युनिटमध्ये काम करतात. या व्यतिरिक्त प्लास्टिक प्रोसेसिंग उद्योगात पाच मिलियन कामगार आहेत. या सगळ्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे सरसकट बंदी घालणे घातक ठरणार असून आम्ही लवकरच यासंदर्भात सरकारशी बोलणी करणार आहोत.प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे प्लास्टिकचा प्रसार होण्यास अटकाव होऊन प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने दमदार पाऊल पडेल. प्लास्टिकशी संबंधित सर्वच उत्पादनांवर बंदी घातली पाहि​जे. प्लास्टिकच्या बॅगा, कप या वस्तूही निकालात काढल्या पाहिजेत. एवढेच नव्हे तर प्लास्टिकच्या खेळण्यांवरही बंदी आणली पाहिजे. प्लास्टिकला प्रतिबंध करण्यासाठी कायदे आहेत. ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी होती. आता ५० मायक्रॉनपेक्षा कमी ​जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. हा कायदा फक्त शहरातच नव्हे, तर गावखेड्यातही लागू आहे. परंतु आजही सर्रास या पिशव्यांचा वापर केला जातो. दूध, तेल तसेच किराणा सामानासाठीही प्लास्टिकचा वापर केला जात आहे. या पिशव्या म्हणजे कॅरी बॅग नाहीत, असा युक्तिवाद दुकानदार करतात. परंतु तो दिशाभूल करणारा आहे. प्लास्टिकवर बंदी घातल्याने उद्योग मोडित निघतील, हजारो लोक बेरोजगार होतील, असे म्हटले जाते. परंतु, प्लास्टिकच्या दुष्परिणामांची कधी कोणी चिंता केली आहे का? यूट्युबर सर्च देऊन बघा, प्लास्टिकचे दुष्परिणाम काय असतात, हे पाहायला मिळेल. आज समुद्रात वाहून गेलेल्या प्लास्टिकमुळे समुद्रात प्लास्टिकचे डोंगर निर्माण होऊ लागले आहेत. काही ठिकाणी तर प्लास्टिकची बेटे तयार झाली आहेत. एक प्रकारे आपली वाटचाल ही विनाशाकडे सुरू आहे. आता सुका आणि ओला कचरा वेगळ्या पिशव्यांमध्ये टाकण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी पुन्हा प्लास्टिकच्याच पिशव्यांचा वापर होणार. लोकांनी सुका कचरा वेगळा करण्यासाठी या पिशव्यांऐवजी अन्य पर्याय वापरला पाहिजे. लाखो लोक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरतात त्यांनी काय करायचे, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर माझे म्हणणे असे आहे की, घरातून ती बाटली भरून न्या, संपली की कार्यालयात पाणी भरून घ्या. त्यामुळे त्या बाटलीचा पुन्हा वापर होईल. तुम्हाला प्रत्येक वेळी नवी बाटली घ्यावी लागणार नाही. त्यामुळे या बाटल्यांचा वापरही कमी होईल. सिक्कीममध्ये प्लास्टिकवर पूर्ण बंदी आहे. तिथे प्लास्टिकची बाटली वापरली जात नाही, पिशवी वापरली जात नाही. त्यांचे कुठे काय अडले आहे का? काहीच नाही. मग आपले तरी प्लास्टिकवाचून काय अडणार आहे. उलट पर्यावरणाला हानी पोहोचवणारी एक वस्तू नाहीशी होईल. आज आम्ही आरे कॉलनी प्लास्टिकमुक्त करण्यासाठी झटत आहोत. अशा मोह‌मिा सगळीकडे सुरू झाल्या पाहिजेत. आज गावपातळीवरही प्लास्टिकचाच कचरा दिसतो. प्लास्टिकवरील बंदीमुळे चित्र पालटण्यास मोठी मदत होईल.


महत्वाच्या बातम्या



हवामान