बीजेपी सरकार २०१९ मध्ये स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पण, आज मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा फेरबदल केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज मोठे फेरबदल पाहायळा मिळणार आहेत. जवळपास ४३ मंत्री आज सायंकाळी पदाची शपथ घेणार आहेत. या समारंभापूर्वीच अनेक मंत्र्यांनी राजीनामे देण्यात सुरुवात केलीये. अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या पदरी दोन मंत्रिपदं जवळपास निश्चित आहे. खासदार नारायण राणे आणि कपिल पाटील यांना दिल्लीवरुन तातडीनं फोन आल्याची माहिती आहे. मोदी सरकारमधून काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. २०१९ मध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. पण, आज मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा फेरबदल केला जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. केराज्यमंत्री अनुराग ठाकूर, पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मांडविया, जी. किशन रेड्डी यांना कॅबिनेटमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ११ महिला, २७ ओबीसी, १२ अनुसूचित जाती , ८ अनुसूचित जमाती, १ मुस्लिम, १ शिख , १ बौद्ध, १ खिश्चन ,१ जैन , १३ वकील , ६ डॉक्टर ,५ इंजिनियर , ७ प्रशासकीय अधिकारी अशा विविध घटकांना स्थान देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चार नेत्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड यांची नावे निश्चित झाल्याचं सांगितलं जातंय. रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतलं आहे. प्रकृती अस्वस्थेमुळे निशंक यांच्याकडून मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या खासदार देबोश्री चौधरी यांनाही डच्चू देण्यात आल्याचं बोललं जात आहे. पश्चिम बंगालमधून इतर चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडूनही मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. कर्नाटकमधील राजकीय अस्थिरतेमुळे केंद्रानं मंत्रिपद काढून घेतलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य