जळगाव\ बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ओंकारनगरातील खाजगी जागेत अनधिकृतपणे बांधलेली दुमजली आरसीसी इमारत मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून तोडली. याबाबत मनपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष राणे या मनपातील विद्युत विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने १० बाय १५ फूटांची दुमजली आरसीसी इमारत ओंकारनगरातील खाजगी जागेत सामाजिक अंतराच्या जागेत अनधिकृतपणे बांधली होती. त्याबाबत त्यांच्या मोठ्या भावानेच शरद राणे यांनी मनपात नगररचना विभागाकडे २०१० मध्ये तक्रार केलेली असल्याने सुनावणी घेऊन नगररचना विभागाने हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे सकारण आदेश अतिक्रमण विभागाला दिले होते. दोन वेळा परतवले होते पथक यापूर्वी अतिक्रमण विभागाचे पथक दोन वेळा जाऊन रिकाम्या हाती परतले होते. कारण दर वेळा या घरात राहणारे राणे पतीपत्नी घरातील सामान न काढता घराला कुलुप लावून निघून जात होते. त्यामुळे कारवाई टळत होती. अखेर हातोडा पडला गुरूवारी मात्र अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान, नगररचना विभागाचे अभियंता शेख व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी राणे कुटुंबही पुन्हा कुलुप लावून आयुक्तांच्या भेटीला गेले. मात्र आयुक्तांनी कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे अतिक्रमण विभागाने पंचनामा करून वरच्या मजल्याचा स्लॅब तोडण्यास सुरूवात केली. मात्र ही इमारत तिन्ही बाजूंनी घरे असल्याने केवळ समोरील वापराची जागाच ये-जा करण्यासाठी असल्याने तेथपर्यंत जेसीबी नेणे शक्य ह ोत नसल्याने घण व हातोड्याच्या सहाय्याने हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात करण्यात आली. स्लॅप व लिंटेल लेव्हलपर्यंतचे बांधकाम सायंकाळपर्यंत तोडण्यात आले.
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य